जामनेर नगर परिषद मुख्याधिकारी व सहकारी यांचेकडून 210 कोरोना फायटर यांना धान्याचे किट वाटप, एक प्रेरणा दाई उपक्रम

जामनेर – नगर परिषद व मुख्याधिकारी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अतिशय चोख जबाबदारी पार पाडत असून एक चांगल्या प्रकारचे टिम वर्क त्यांनी उभे केले आहे. आजारा संबंधी जनजागृती असो की जिल्हा अधिकारी यांचे येणारे आदेश यांची अंमलबजावणी असो ते व्यवस्थित फॉलो करीत आहेत तर सफाई कामगार, निर्जंतुक करणारे कामगार तसेच फायर फायटर या सर्व लोकांना कोरोना फायटर म्हणून संबोधले जात आहे. हे सर्व कर्मचारी दिवस रात्र काम करीत आहे अश्या वेळेला सरकार हि आर्थिक अडचणीत असल्याने पगार हि मागे पुढे होत असतात म्हणून मुख्याधिकारी व त्यांचे वर्ग 2 चे 16 कर्मचारी यांनी पदर मोड करून एकत्रित रक्कम जमा करून त्या रक्कमेतून 210 कोरोना फायटर कुटुंबाला धान्यांचे किट ची व्यवस्था लावून त्यांना त्याचे वाटप करण्यात आले. आपल्या आर्थिक कमकुवत सहकारी यांचेसाठी बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असणाऱ्या लोकांकडून निधीची तरतूद करून त्याचे केलेले नियोजन खरोखर उल्लेखनीय आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *