शेंदुर्णीचा जावई नाशिक मध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ.जवाईबापूंनी शेंदूरणीला मुक्काम केल्यामुळे शेंदूरणीतील 11 लोकांचे स्वॉब नमुने घेऊन त्यांना केले क्वांरंटाईन,

 शेंदूर्णी शहरातील जावई असलेली वेक्ती नाशिक येथे कोरोना positive आढळलेली आहे.सदर  वेक्ती ही दि,24/04/2020 रोजी त्याची पत्नी व मुले यांना सोडण्यासाठी शेंदूर्णी येथे आलेली होती.सदर वेक्ती ज्या भागात येऊन गेली ती भोई गल्ली चे पूर्ण क्षेत्र हे नगरपंचायत शेंदूर्णी कडून पूर्णतःबंद करण्यात आलेला आहे.सदर वेक्तीच्या जवळच्या संपर्कातील वेक्तींना प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.राहुल निकम यांनी पहुर येथे स्वॉब घेण्यासाठी पाठवले आहे.त्यानंतर सर्वांना गरुड माध्यमिक विद्यालयाच्या महिला वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. सदर भाग हा पूर्ण पणे निजंतुकीकरन (sanitize) करण्यात आलेला असून पूर्णपणे बंद केलेला आहे. सदर परिसराला मुख्याधिकारी साजिद पिंजारी, तालुका आरोग्य अधिकारी राजेश सोनवणे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर राहुल निकम यांनी भेट देऊन योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत सदर वेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद अग्रवाल उपस्थित होते.
     सर्व व्यक्तींनी सामाजिक अंतराच्या पालन करावे व करणा पासून लांब राहावे असे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी काळविले आहे.
Previous post अमळनेरला आणखी १ पॉझिटिव्ह रुग्ण
Next post महाराष्ट्र कोरोना / राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडा 11 हजार 506 वर, तर 485 रुग्णांचा मृत्यू; सर्वात जास्त 320 मृत्यू मुंबई आणि उपनगरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *