जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 8 मे रोजी 14 लाख 74 हजार 611 रुपयांची मदत प्राप्त

जळगाव-संपुर्ण जगाबरोबरच भारतात आणि महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा
मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन
स्थरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेतच. या उपाययोजनांच्या जोडीला आवश्यक असते ती
आर्थिक मदत आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील काही
राष्ट्रीयकृत बँका,सहकारी बँका व नागरी पतपेढ्या तसेच सहकारी संस्थांकडून कोव्हिड-19 चा मुकाबला
करण्यासाठी आर्थिक निधी म्हणून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जमा झालल्या निधी आणि
सहाय्यता निधी देणाऱ्या बँका व विविध संस्था तसेच त्यांच्याकडून प्राप्त निधीचा तपशिल अशाप्रकारे आहे.
शरदचंद्रिका नागरी सह. पत. मर्या. चोपडा, – 51 हजार, वनिता महिला ग्रामिण बिगर शेती सहकारी
पतसंस्था,चहार्डी ता.चोपडा- सेट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चहार्डी ता.चोपडा -5 हजार, श्री. तात्यासो नामदेव
महादू महाजन ग्रा. बि. शेती सह. पतसंस्था मर्या, धानोरा ता.चोपडा – 1 हजार, गोपी नागरी सह. पतसंस्था
मर्या. चोपडा ता. चोपडा- 1100/-, श्री स्वामी समर्थ नागरी सह. पतसंस्था मर्या. चोपडा- 1100/-, मराठा
समाज बहुउद्देशिय सह. संस्था मर्या चोपडा- 1100/-, शासकीय शिक्षक सहकारी सोसा. लि. चोपडा -2200/-,
Soc J D Secondary Teachers and Teachin – 11 लाख 11 हजार 111/- बँक ऑफ बडोदा, यांचेकडील
डि.डी. 2 लाख 1 हजार, मार्केट यार्ड, जळगाव,. 1 लाख अशी एकूण रक्कम रुपये 14 लाख 74 हजार 611 इतकी
रक्कम धनादेश आणि धनाकर्षा (डी.डी) द्वारे 8 मे, 2020 रोजी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोव्हीड
-19 मध्ये जमा करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *