अमळनेरचे शल्यचिकित्सक डॉ. अनिल शिंदेंचे मार्गदर्शन कोरोना हटाओसाठी मोलाचे ठरेल

 अमळनेर, प्रतिनिधी– खानदेशातील ख्यातनाम शल्यचिकित्सक आणि मेडिकल ऑफिसरचाही प्रदीर्घ अनुभव असलेले येथील डॉ. अनिल शिंदे यांचे मार्गदर्शन कोरोना हटाओ अभियानासाठी मोलाचे ठरणारे राहील.
कोविड हेल्थ सेंटरला
तज्ज्ञ डॉक्टरांची स्वयंसेवा
    अमळनेर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत कोविड हेल्थ सेंटर सुरू करतांना ह्या हॉस्पिटलला अटॅच फिजिशियन, एम.डी. डॉ. संदीप जोशी हे आणि त्यांच्यासोबत अमळनेरातील खाजगी प्रॅक्टिसनर एम.डी. डॉक्टर्स– अविनाश जोशी, किरण बडगुजर, नितीन पाटील, शरद बाविस्कर, प्रशांत शिंदे हे स्वयंसेवी योगदान देणार आहेत. या डॉक्टरांच्या टीमला शल्यचिकित्सक डॉ. अनिल शिंदे यांचे मार्गदर्शन मिळत गेल्यास अधिक चांगले रिझल्ट्स मिळतील.
       कारण डॉ. अनिल शिंदे हे गोल्ड मेडलिस्ट आणि वैद्यकीय क्षेत्रात आज तरी त्यांना खानदेशात तोड नाही. ते आधी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात शल्य चिकित्सक होते त्याआधी त्यांनी पाचोरा येथेदेखील मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे आणि अमळनेरच्या प्रताप हॉस्पिटलचे ते अधीक्षक वैद्यकीय अधिकारी होते. त्यांचे स्वतःचे खाजगी मोठे हॉस्पिटल आहे. वैद्यकीय क्षेत्रात ते गुरुवर्य म्हणून मानले जातात.

       असे ते बैठकींना उपस्थिती देतच आहेत. त्यांच्यावर अमळनेरच्या ह्या डेडिकेटेड कोबी हॉस्पिटलची लीडरशिप करण्याची जबाबदारी टाकायला हवी असे जाणकारांचे मत आहे.
Previous post जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 8 मे रोजी 14 लाख 74 हजार 611 रुपयांची मदत प्राप्त
Next post राज्यशासन व स्थानिक प्रशासनाचा हलगर्जीपणा अमळनेरकरांना भोवतोय – आ.स्मिताताईंचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *