अर्सेनिक अल्बम-30 औषधाची किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास कारवाई होणार – गोरक्ष गाडीलकर

जळगाव – कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरामध्ये मोठया प्रमाणावर मनुष्यहानी झालेली असून, लाखो लोक बाधीत झालेले आहे. अर्सेनिक अल्बम-30 या होमीओपॅथी औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून मोठया प्रमाणावर या औषधाचा खप वाढलेला आहे. या संधीचा गैरफायदा घेवुन काही मेडीकल स्टोअर्समधून ही औषधे अवास्तव किंमत आकारुन विकली जात आहे. मेडीकल स्टोअर्स चालक आणि काही होमीओपॅथी डॉक्टरांची ही कृती निश्चितच बेकायदेशीर आहे.

अर्सेनिक अल्बम-30 या औषधाचा तयार करण्याचा खर्च, वाहतुक खर्च व इतर अनुंषगीक खर्च कमीत कमी नफा विचारात घेता 80 ते 100 गोळ्या असलेली एक बॉटल (One Drum) ही जास्तीत जास्त 11 रुपयांपर्यंत विक्री करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्याचा व सामाजिक बांधिलकीचा विचार करता सर्व मेडीकल स्टोअर्स आणि होमीओपॅथीची प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स यांना सुचीत करण्यात येते की, अर्सेनिक अल्बम -30 या औषधाच्या एका बॉटलची (One Drum) किंमत ही 11 रुपयांपेक्षा जास्त आकारु नये.

जे मेडिकल स्टोअर्स चालक आणि होमीओपॅथी डॉक्टरर्स 11 पेक्षा जास्त किंमत आकारतील त्यांचेवर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 आणि भारतीय दंडविधान संहिता 1860 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. असे अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा परिस्थिती नियंत्रक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *