या जिल्ह्यांत एसटी धावणार; ज्येष्ठांना प्रवासास मनाई

मुंबई:करोना साथीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागांमध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून उद्या दि. २२ मे पासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.

राज्यात २३ मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरातील अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बससेवा संपूर्ण बंद आहे. परंतु, लॉकडाऊनच्या चौथ्या कालखंडामध्ये राज्य शासनाने रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता काही अटीशर्तींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला केवळ जिल्हा-अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गांवर उद्यापासून एसटी बससेवा सुरू होत आहे, असे परब यांनी स्पष्ट केले. या बससेवेसाठी नियमावली तयार करण्यात आली असून त्याचा तपशीलही परब यांनी दिला. अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहनही अनिल परब यांनी केले आहे.

Previous post अस्तित्व दाखविण्यासाठीच भाजपचा आंदोलनाचा फार्स : थोरात
Next post जळगाव जिल्ह्यात आज आणखी ३० कोरोना बाधित रूग्ण आढळले जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली ३८१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *