देशांतर्गत विमान सेवा / उद्या 1050 फ्लाइट्स: तमिळनाडुनंतर महाराष्ट्राने उड्डाणांना दिली परवानगी,

नवी दिल्ली. लॉकडाउन फेज-4 दरम्यान सोमवारपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार आहेत. उड्डयन मंत्रालयाने सांगितल्यानुसार उद्या 1050 फ्लाइट्स ऑपरेट होतील. राज्यातंरग्त उड्डाणे, क्वारंटाइन पीरियड आणि प्रवाशांच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरबाबत परिस्थिती स्पष्ट होत नव्हती. महाराष्ट्र, बंगाल आणि तमिळनाडू देशांतर्गत उड्डाणे करण्याच्या बाजुने नव्हते.

पहिले तमिळनाडुने उड्डाणांना परवानगी दिली आणि रविवारी प्रवाशांसाठी गाइडलाइन जारी केल्या. आता महाराष्ट्रानेही 50 फ्लाइट्सच्या ऑपरेशनला मंजुरी दिली आहे. गाइडलाइनदेखील लवकरच जारी होईल.

यादरम्यान, नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की- उड्डयन मंत्रालयाकडून उडान योजनेंअंतर्गत विमान सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात उत्तर-पूर्व क्षेत्राला जोडणाऱ्या उड्डाणांना प्राथमिकता दिली जाईल.

यापूर्वी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालने उड्डाणांवर चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की,’ रेड झोनमधल्या विमानतळांना आता उघडणे मुर्खपणाचे ठरेल. प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करणे आणि लाळेचे सँपल घेणे पुरेसे नाही.’ पश्चिम बंगालनेही उड्डाणे सुरू करण्यावर चिंता व्यक्त केली हे.

हाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी सांगितले की, आज त्यांनी एविएशन मिनिस्टर हरदीप सिंह पुरी यांच्याशी चर्चा केली. ठाकरे म्हणाले की, ‘मी पुरी यांना म्हणालो की, विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवाय.’ यापूर्वी महाराष्ट्र सरकारने शनिवारी केंद्र सरकारसोबत चर्चा केली होती. यात म्हटले की, मुंबई आणि पुण्यासारखे शहर रेड झोनमध्ये आहेत. एअर ट्रॅफिकच्या बाबतीत दोन्ही शहर महत्वाचे आहेत. या दोन शहरात नागरिकांना फिरण्यास पूर्णपणे बंदी आहे. यामुळे सध्या विमानसेवा सुरू केली जाऊ शकत नाही.

ममता बॅनर्जींनी अम्फान वादळाचे कारण दिले

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या की, अम्फान वादळानंतर राज्यात मोठे नुकसान झाले आहे. आम्ही हे सर्व ठीक करण्यात व्यस्त आहोत. त्यामुळे आम्ही नागरी उड्ड्यान मंत्रालयाला 30 मे पर्यंत कोलकाता आणि 28 मे पर्यंत बागडोगरा एअरपोर्टवर उड्डाणे स्थगित करण्यास सांगितले होते.

Previous post देशात कोरोना / संक्रमितांचा आकडा 1 लाख 32 हजार 753 वर
Next post जिल्ह्यात आज आणखी ७ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *