अर्थसहाय्य योजनेच्या १२ लाभार्थीनींना–आ. अनिलदादांच्याहस्ते प्रत्येकी २० हजाराचे चेक वाटप

अमळनेर- राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अमळनेर शहरासह तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील १२  विधवा लाभार्थी भगिनींना प्रत्येकी २०  वीस हजाराचे धनादेश तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या दालनात आमदार अनिल दादांच्याहस्ते आज वितरित करण्यात आले. निराधारांना आधार देणे हाच आपला शुद्ध हेतू यामागे असल्याचे यावेळी बोलताना आमदार अनिल दादांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेचे 12 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश वितरण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर संजय गांधी 147 श्रावणबाळ 387 व इंदिरा गांधी 91 अशा योजनांचे 625 प्रकरणे मंजूर करण्यात आली.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी गोरगरिबांना आधार देणारा हा विषय असल्याने अपघाती अथवा नैसर्गिकरित्या कुटुंबप्रमुख मृत झालेल्या लाभार्थी असलेल्याना आधार मिळावा हाच आपला प्रामाणिक हेतू असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ व इतर उपस्थित होते.
राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेत कुटुंबप्रमुख मृत झालेल्या 12 महिलांना प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 2 लाख 40 हजारांची रक्कमेचे धनादेश वितरण झाले. त्यात शालुबाई गोविंदा वानखेडे लताबाई अर्जुन धनगर सुरेखा नाना शेटे, सर्व अमळनेर तुळसाबाई साहेबराव महाले जुनोने, मनीषा बापू पारधी जानवे, शांताबाई जंगलु भील बोरगाव मायाबाई मंगा भिल बोरगाव, मंगलबाई सुक्राम भिल पळासदळे, प्रमिला अशोक चौधरी अमळनेर, आशाबाई अनिल मस्के पिंपळे, भुराबाई अशोक साळुंखे अमळनेर, साधना चंद्रकांत गीते अमळनेर या सर्व लाभार्थ्यांना हे धनादेश वितरण झाले.
Previous post जिल्ह्यात आज आणखी ७ कोरोना बाधित रूग्ण आढळले
Next post देशात कोरोना / सुप्रीम कोर्ट म्हणाले – प्रवासी मजुरांबाबत त्रुटी आहेत, केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांच्या प्रवास, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *