परीक्षा रद्द / सीबीएसईकडून 10वी आणि 12वीच्या उर्वरीत विषयांच्या परीक्षा रद्द, मागील 3 परीक्षांच्या आधारे दिले जातील गुण

नवी दिल्ली. सीबीएसईने 10वी आणि 12वीच्या उर्वरीत विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. बोर्डाने सुप्रीम कोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावनीदरम्यान ही माहिती दिली. आता मागील तीन परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्क्स दिले जातील. परंतू, विद्यार्थ्यांकडे भविष्यात परीक्षा देण्याचा पर्याय असेल.

29 विषयांची परीक्षा बाकी होती

12वी ची परीक्षा 1 ते 15 जुलैदरम्यान होणार होती. देशभरात 12 विषयांचे पेपर बाकी होती. तर, उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये या 12 सोबतच अजून 11 मुख्य विषयांच्या परीक्षा बाकीह होत्या. 18 मार्चला या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर, उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये सीबीएसई 10वीचे 6 पेपर बाकी होते. याप्रकारे 10वी आणि 12वीच्या 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 29 विषयांच्या परीक्षा देणे गरजेचे होते.

परीक्षा रद्द करण्यासाठी पालकांनी दाखल केली याचिका

10वी आणि 12वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोर्टात परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. यात म्हटले होते की, सीबीएसईच्या परदेशातील 250 शाळेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात कर्नाटकचे एक उदाहरणदेखील देण्यात आले. परीक्षा देणाऱ्या मुलाचे वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने 24 मुलांना क्वारेंटाइन करण्यात आले होते.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे या तीन परीक्षांची स्थिती स्पष्ट होईल

जेईई मेन – 18 जुलै-23 जुलै. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थी जेईई अॅडवांस्डसाठी पात्र होतात. जेईई मेनमधून एनआयटी, सरकारी आणि खासगी इंजीनियरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळते.

नीट – 26 जुलै. या परीक्षेच्या माध्यमातून सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि बीडीएसला अॅडमिशन मिळते.

जेईई (अॅडवांस्ड) – 23 ऑगस्ट. या परीक्षेच्या माध्यमातून 23 आयआयटीमध्ये अॅडमिशन मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *