चाळीसगाव – तालुक्यातील भवाळी येथील ६० वर्षीय वृद्ध तसेच चाळीसगाव शहरातील हुडको परिसरातील महिलेचा आज जळगाव येथे मृत्यु झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे,तसेच शहरातील कोविड केअर सेंटर मधून आज तीन जण कोरोना मुक्त झाले,यामध्ये पोलिस बांधव तसेच गोपाळपुरा परिसरातील २ युवक आहेत,सदरिल परिसरात आनंद व्यक्त करुन त्यांचे स्वागत करण्यात आले,परंतु तालुक्यात कोरोनाचे तीन नवे रुग्ण सापडल्याने प्रशासनाची धावपळ वाढली,त्यात भोरस येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ५५वर्षीय पुरुष,५०वर्षीय महिला बाधित आढळली तसेच
घाट रोडवरील बाराभाई मोहल्ला येथील ६० वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घाट रोड परिसरात खळबळ उडाली
आहे, तिन्ही बाधितांच्या संपर्कातील तसेच अनिल नगर परिसरातील एकुण ७० संशयितांना चाळीसगाव कोविड सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी दिली आहे.