मेक्सिको- कोरोनाच्या महासंकटाचा सामना करत असताना मेक्सिको शहरात अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोच्या इरापुटो शहारत हा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये बरेच लोक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मेक्सिको पोलिस आणि सैनिकांची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. अज्ञात अंदाधुंद गोळीबार करून पसार झाले.
एका महिन्यात गोळीबाराची दुसरी घटना आहे. याआधी ६ जूनला गोळीबार झाला. त्यावेळी १० जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत कारवाईची मागणी केली आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहिती एकापेक्षा जास्त जण गोळीबार करणारे असू शकतील. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या या देशास ड्राह तस्करांचे स्वर्ग म्हणतात. त्या भागांमधून अमेरिकेसह जगातील ब-याच देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी केली जाते. स्थानिक पोलिस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तस्करीचे प्रमाण कमी झालं आहे.