जामनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन . इंधनाचे दर कमी करून सामान्यांना दिलासा देण्याची मागणी ! .

जामनेर – सध्याच्या काळात सगळेच कोरोनाच्या महामारीने त्रस्त झाले असुन या संकटाने देशातील लाखो सर्व सामान्यांचा रोजगार हिरावला आहे.उद्योगधंदे अजुनही पुर्वपदावर आलेले नाहीत व केव्हा पुर्व पदावर येतील हेही अजून निश्चित नाही.अशा दुहेरी संकटाचा सामना करताना.सर्व सामान्यांंची पोट भरण्यासाठी तारांबळ होत आहे.त्यातच भर म्हणून आता पेट्रोलमागे प्रति लिटर रूपये ९.१२, तर डिझेल प्रति लिटर ११.०२रूपये दरवाढ करण्यात आली असुन.आतंरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती पाहता इंधनाच्या किंमती कमी करून सर्व सामान्यांना दिलासा द्यावा.अशी मागणी एक दिवसीय धरणे आंदोलन करून जामनेर तालुका कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी एस.टी पाटील,मुलचंद नाईक,गणेश झाल्टे,मुसा पिंजारी,राहुल पाटील,रफीक मौलाना,इद्रीस पटेल,मंजूर जलालखान,अ.रऊफ शेख महेमुद आदीच्या मागणी निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *