मुंबईकरांसाठी गुड न्यूज ;५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आलेय – जयंत पाटील

मुंबईकरांची तहान भागणार…

मुंबई  – मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आले असल्याची गुड न्यूज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईकरांना दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार मुंबईला पाणी पुरविणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईत पाण्याची कमतरता भासणार  नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचे पाण्याचे टेंशन मिटले आहे.
मुंबईची लोकसंख्या पाहता मुंबईला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागतो. झोपडपट्टी भागात अनेकदा पाणी मिळत नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळते मात्र वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडल्याने मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *