प्योंगयांग (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन सातत्याने काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. काही आठवड्यांपूर्वीही ते गायब झाल्याने चर्चेत आले होते.अलीकडेच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये युद्ध होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. किम यांच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो प्रसारीत केल्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या आदेशावरून सीमेवरील दक्षिण कोरियाच्या संपर्क कार्यालयावर बॉम्ब टाकून ते जमीनदोस्त करण्यात आले.
किम जोंग उन यांच्या आदेशावरून सुमारे दोन आठवड्यांपूर्वी उत्तर कोरियाच्या सैन्याशी बातचीत कारण्यासाठी दक्षिण कोरियाने सीमारेषास्थित तयार केलेल्या संयुक्त कार्यालयावर बॉम्बस्फोट घडवून आणला. आता दक्षिण कोरियाने किम जोंग यांच्या पत्नीची आक्षेपार्ह छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल केल्याचे उघड झाले आहे आणि फुग्यांच्या माध्यमातून ही छायाचित्रे उत्तर कोरियाच्या सीमेवरही टाकण्यात आली. किम जोंग यावर भयंकर चिडला आणि त्याने ऑफिसवर बॉम्बफेक केली. हे कार्यालय उत्तर कोरियाच्या सीमेवर असलेल्या कायेसोंग शहरात होते.