मुक्ताईनगर : देश व राज्य भरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून कडकडीत लॉक डाऊन सुरू आहे . त्यातच वाढती रुग्ण संख्या पाहता हा लॉकडाऊन निघणे अशक्य प्राय दिसून येत आहे .आणि मुक्ताईनगर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून शहरातील प्रत्येक भागात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने ठीकठिकाणी कंटेनन्मेंट झोन निर्माण होत असल्याने अनेक कुटुंबियांच्या हातचा रोजगार हिरवला आहे . अशात काही कुटुंबियांनी खाजगी फायनान्स कंपन्यांद्वारा कर्जाची उचल केलेली होती .ते दैनंदिन मजुरीत खर्चाला हात आवरून तोकड्या बचतीद्वारे नियमित हप्त्याची फेड करीत होते . मात्र आता लॉकडाऊन हे हप्ते भरणे जिकरीचे झाले आहे .त्यातच रिझर्व्ह बँक आणि शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत की ३१ ऑगष्ट पर्यंत कोणतीही बँक अथवा फायनान्स कंपनीने सक्तीची किंवा कोणत्याही स्वरुपाची कर्ज वसुली करू नये .असे असताना मुक्ताईनगर शहरात भुसावळ व मलकापूर येथून काही बचत गट चालविणारे एजंट येत असून ते सक्तीने कर्जाचे हप्ते वसुली करीत आहे . याबाबत बेजार होत चक्क काही महिलांनी तहसिलदार शाम वाडकर व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना लेखी निवेदन देत संबंधीत बचत गट फायनान्स कंपनी एजंट व मॅनेजर यांच्याविरुद्ध भांदवि कलम १८६० अन्वये कलम ५०४ ,५०६ अन्वये गुन्हा दाखल करून संबंधीत कंपन्यांवर निर्बंध लादण्यात यावे अशी मागणी केली आहे .
निवेदन देतेवेळी अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान , शेख सलाम , रईसाबी , रुदानाबी , जहिराबी , सुरय्याबी, समीनाबी , आबेदाबी, खलेदा इरफान, नाजीयाबी , फरीदाबी, शबानाबी , शाहिदाबी आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या .