कामाच्या वेळेनुसार रेल्वेची अत्यावश्यक सेवा देण्याची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : कामाच्या वेळेनुसार लोकल उपलब्ध करून देण्याची मागणी डहाणू ते वैतरणादरम्यान राहणा-या परिचारिका, वॉर्डबॉय यांनी पश्चिम रेल्वेला पत्र लिहून केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (शताब्दी रुग्णालय), सावित्रीबाई फु ले रुग्णालय, भगवती रुग्णालय, कूपर, नायर, केईएम, सिद्धार्थ या रुग्णालयांत काम करणा-या काही परिचारिका, वॉर्डबॉय, डॉक्टर, सफाई कर्मचारी डहाणू, वानगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, के ळवे, सफाळे, वैतरणा येथे राहतात. परंतु लोकलच्या वेळा सोयीच्या नसल्याने सकाळी, दुपारी आणि रात्री अशा तीन पाळीत काम करणा-या डहाणू ते विरार पट्ट्यातील सुमारे २५० ते ३०० कर्मचा-यांची गैरसोय होते आहे.सध्या डहाणू ते विरार लोकल प्रवास के ल्यानंतर विरारला उतरून पुढे मुंबईपर्यंत येण्यासाठी दुसरी लोकल पकडावी लागते, परंतु काही फे-यांच्या बदललेल्या वेळांमुळे सकाळी डहाणूपासून लोकल पकडताना मोठी कसरत रुग्णालय कर्मचा-यांना करावी लागत आहे. पहाटे ५ वाजता डहाणू ते बोरिवली अशी थेट मेमू गाडी बंद करून त्याऐवजी पहाटे ५.४० वाजता डहाणू ते विरार लोकल सोडण्यात आली. त्यामुळे विरार येथे उतरून मुंबईच्या दिशेने दुसरी लोकल पकडावी लागते. त्यातच जलद लोकल असल्याने बोरिवली येथील पालिका व अन्य रुग्णालयांत काम करणारे कर्मचारी कसेबसे रिक्षा किं वा बसने जातात. मात्र कांदिवली येथे काम करणा-या कर्मचा-यांना रिक्षा, बस करून रुग्णालय गाठताना बराच मनस्ताप होतो. त्यामुळे सकाळी ७ च्या पाळीत काम करणा-या अनेक रुग्णालयांतील कर्मचा-यांना आठ वाजल्याशिवाय पोहोचता येत नाही. हीच परिस्थिती पुढे दादपर्यंत जाताना होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *