नवी दिल्लीः बँक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी काही खास सूचना ट्विटरवरून केल्या आहेत. मोबाइलला सुरक्षित ठेवण्यासाठी यूएसबी डिव्हाईसच्या मदतीने सहज मेलवेयर इन्फेक्शन होवू शकते. कारण, अनेक वेळा त्यांना डिव्हाईसेजला लावले जाते. तसेच विना सेफ्टीचे युजर्स त्याचा वापर करीत असतात. डेटा चोरी आणि व्हायरस इन्फेक्शन साठी जबाबदार यूएसबी डिव्हाईसेजचा वापर करताना सुरक्षित राहा, याची पद्धत स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितली आहे.

एसबीआयकडून सेफ्टी टिप्स अधिकृत ट्विटर हँडलवरून शेयर करण्यात आल्या आहेत. @TheOfficialSBI अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विट मध्ये लिहिलेय की, जर तुम्ही कुठलीही एक चूक केली तर तुमच्या यूएसबी डिव्हाईसला धोकादायक मेलवेयर इन्फेक्टेड होऊ शकतो. आपल्या डिव्हाईसला मेलवेयर पासून सुरक्षित ठेवण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा. या ट्विटमध्ये एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा शेयर केला आहे. ज्यात सांगितले की, बँक खातेदारांनी काय करावे अन् काय करु नये.

काय करावे?
>> यूएसबी डिव्हाईसला अॅक्सेस करण्याआधी लेटेस्ट अँटिव्हायरस स्कॅन करा.
>> डिव्हाईसवर पासवर्ड प्रोटेक्शन लावून ठेवा
>> बँक स्टेटमेंट संबंधी फाईल्स आणि फोल्डर्सला एनक्रिप्ट करुन ठेवा
>> यूएसबी मध्ये डेटा कॉपी करण्यासाठी यूएसबी सिक्योरिटी प्रोडक्ट्सचा वापर करा.
काय करू नये?
>> अज्ञात लोकांपासून कोणत्याही प्रकारची प्रमोशनल डिव्हाईस अॅक्सेप्ट करु नका.
>> कधीही आपली सेन्सिंटिव्ही माहिती, जशी बँक डिटेल्स आणि पासवर्ड यूएसबी डिस्क वर ठेवू नका.
>> कधीही व्हायरस इन्फेक्टेड सिस्टम मध्ये आपला यूएसबी डिव्हाईस प्लग इन करू नका.

Previous post कामाच्या वेळेनुसार रेल्वेची अत्यावश्यक सेवा देण्याची मागणी
Next post करोनावरील लस खरोखर कधी येणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *