करोनावरील लस खरोखर कधी येणार?

नवी दिल्ली: करोना विषाणूशी लढण्याचा आणि त्याला रोखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लस. जो पर्यत लस बनत नाही, तो पर्यंत जगातील करोना विषाणूच्या साथीचा आजार संपणार नाही. जगभरातील संशोधक दिवस-रात्र एक करत लस विकसित करण्याच्या कामाला जुंपलेले आहेत. भारतात देखील पहिली लस तयार झालेली आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरलोलॉजी (एनआयव्ही) आणि भारत बायोटेकने संयुक्तपमणे ही लस तयार केली आहे. या लशीच्या चाचणीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मंजुरीही दिली आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही लस तयार होईल असा दावा आयसीएमआरने केला होता. त्यावर वाद निर्माण झाला होता. मात्र, करोनावरील लस नक्की कधी येईल हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

करोनावरील लस भारतात केव्हा उपलब्ध होईल याबाबत फॉरेन ओपीडीचे सीईओ आणि संस्थापक डॉ. इंदर मौर्या यांनी टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीशी बोलताना महत्त्वाचा खुलासा केला आहे. लस केव्हा येणार हे सांगताना आयसीएमआरने घाई करायला नको होती असे डॉ. मौर्या यांचे म्हणणे आहे. १५ ऑगस्ट ही डेडलाइन पाळणे अशक्य असल्याचे लशीची चाचणी करण्याबाबत अनुभव असलेले तज्ज्ञ सांगत आहेत. याचे कारण म्हणजे एकदा का लस तयार झाली की तिला अनेक प्रकारच्या चाचण्यांच्या टप्प्यांमधून जावे लागते. त्यानंतर मग त्या लशीची निर्मिती सुरू होते. या कामासाठी मोठा कालावधी लागतो, असे डॉ. मौर्या यांनी सांगितले. जरी सर्व जगभरात लस निर्मितीचे काम फास्ट ट्रॅकद्वारे केले गेले तरी देखील ऑगस्ट २०२१ च्या पूर्वी जगातील कोणतीही लस बाजारात येऊ शकणार नाही, असे डॉ. मौर्या यांचे म्हणणे आहे.

Previous post
Next post दणका दैनिक पुण्यप्रतापचा: डास प्रबिंधक तसेच औषधी फवारणीस जामनेर येथे प्रारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *