दणका दैनिक पुण्यप्रतापचा: डास प्रबिंधक तसेच औषधी फवारणीस जामनेर येथे प्रारंभ

पुण्यप्रताप न्यूज नेटवर्क
जामनेर- पावसाळ्यात डासांमुळे होणारे संभाव्य साथीचे रोग व कोरोना विषाणुचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणुन जामनेर शहरात जंतुनाशकाची फवारणी करावी, अशी मागणी काल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक शंकर राजपुत यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली होती. या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी राहुल पाटील यांना काल देण्यात आले. होते. दै. पुण्यप्रतापने सुद्धा या वृत्ताला तात्काळ प्रसिद्धी दिली होती. काँग्रेसच्या या आंदोलनासह दै. पुण्यप्रतापच्या वृत्ताची तात्काळ दखल घेत जामनेर नगर परिषदेच्यावतीने आजपासुन शहरात जंतुनाशकाची फवारणी सुरु केली आहे.जामनेर पुरा येथुन आज जंतुनाशक फवारणीस प्रारंभ करण्यात आला आहे. धन्यवाद नगर परिषद प्रशासन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *