गोइंग टू लाँग जर्नी स्टेटस ठेवून पहूरच्या तरुणाने घेतला गळफास

पुण्यप्रताप न्यूज नेटवर्क

पहूर , ता . जामनेर -जामनेर तालुक्यातील पहूरपेठ येथे शासकीय विश्रामगृहच्या बाजूला राहणार्‍या 20 वर्षीय तरुणाने राहत्या घरातच पंख्या जवळील आड्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली .
याबाबत अधिक माहिती अशी की , पहूर पेठ येथील शेतकरी समाधान रामकृष्ण चौधरी यांचा मुलगा राहुल समाधान चौधरी ( वय – 20 वर्षे )हा वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत होता .शिक्षणासोबतच तो आई-वडिलांना शेतकामातही मदत करायचा .भारतीय सैन्य दलात जाण्याची त्याची तीव्र इच्छा होती .त्यासाठी आवश्यक असलेली तयारीही तो करायचा .आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारासही तो रनिंग साठी गेला असल्याचे मित्रांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *