अन्यथा पुण्यात पुन्हा कडक लॉकडाउन, अजित पवारांचा इशारा

कंटेनमेंट झोन वगळता पुण्यातील काही भागात लॉकडाऊन शिथिल केला होता. मात्र, अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. नियमांचं पालन न केल्यास पुणे आणि पिंपरीमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाउन घेण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे १३ जुलैपासून पुढचे १५ दिवस लॉकडाउन घेण्यात येऊ शकतो.  विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये शुक्रवारी कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.सोमवार, १३ जुलैपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कडक लॉकडाउन घेण्यात आला आहे. करोनाबाधित रुग्णांची वाढत्या संख्यामुळे लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, अशा इशारा अजित पवार यांनी दिला. पुणे आणि पिपंरी चिंचवडमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरांसह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.यापूर्वी ल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. “करोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला होता.दरम्यान, पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३० हजारांकडे गेली आहे. यापैकी १३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर ९०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसागणिक पुणे आणि पिंपरीमधील करोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *