कुख्यात गुंड विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळीच कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला. आता विकास दुबेचे साथीदार असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सोनू त्रिवेदी या दोघांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी ही कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा चकमकीत खात्मा झाला. या घटनेनंतर त्याचे साथीदार फरार झाले होते. यातले दोघे ठाण्यात लपल्याची माहिती दया नायक यांना मिळाली होती. ज्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली.