लॉकडाऊनच्या काळातही कोरोना सुसाट

जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह 238 सापडले

बाधितांची संख्या 5962 वर पोहचली

पुण्यप्रताप न्यूज नेटवर्क

जळगाव -जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 159 रूग्णांनी कोरोनावर मात केली . जिल्ह्यात आतापर्यंत 3542 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 2091 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 238 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 5962 झाली असून जिल्ह्यात उपचारादरम्यान आतापर्यंत 329 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल 238 रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात सर्वाधीक 83 रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत . याच्या खालोखाल आज जामनेर 12 , चाळीसगाव 9 , रावेर 13 , भुसावळ 6 आणि मुक्ताईनगर 31, जळगाव ग्रामीण 7 , अमळनेर 6, चोपडा 32 , पाचोरा 0 , धरणगाव 15 , एरंडोल 4 , पारोळा 2 , बोदवड 0 , यावल 10 अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे जर आपणच त्याची अंबलबजावनी करावी. नाही तर येणारा काळ हा जळगाव जिल्ह्यासाठी खूप घातक ठरू शकतो प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे अजूनही पूर्णतः पालन होत नाही आहेत,तरीही नागरिकांनी शासकीय सूचनांचे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *