कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत राबविण्यात येणा-या उपाययोजनांकरीता समन्वय व नियंत्रण ठेवण्यासाठी डॉ. अरुण हुमणे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

जळगाव – सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील 14 मार्च रोजीच्या पत्रानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा,1897 हा 13 मार्च,2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्राचे कोव्हिड – 19 वर नियंत्रण आणण्यासाठी त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या अंमलात आणण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

जळगाव शहर महानगरपालिका जळगाव क्षेत्राकरीता कोव्हिड-19 च्या अनुषंगाने राबविण्यात येणा-या उपाययोजनेशी संबंधित अडी-अडचणी सोडविणे, सर्व संबंधित ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना येणा-या अडी-अडचणी सोडवण्याकरीता मार्गदर्शन करणे, वैद्यकीय सोयी सुविधेबाबत तसेच कोव्हिड-19 बाधित रुग्णांवर उपचाराकरीता तज्ञ मार्गदर्शन पुरविणे व जळगाव शहर महानगरपालिकेमार्फत कोव्हिड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणा-या सर्व उपाययोजना, उपक्रम याबाबत समन्वय व नियंत्रण ठेवणे याकरिता प्राध्यापक व प्रमुख जनऔषध वैद्यकशास्त्र डॉ. अरुण हुमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (प्रतिनियुक्तीने) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम,1897 भारतीय दंडसंहिता,1860 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Previous post लॉकडाऊन काळात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई छाप्यात जप्त केली केमिकल व रंगयुक्त डाळ
Next post अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या  कोविड-19 च्या परिस्थितीमुळे शक्य नाही  – उदय सामंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *