जळगांव जिल्हा सुसाट जिल्ह्यात कोरोनाने सहा हजाराचा टप्पा ओलांडला नव्याने २०५ रूग्ण कोरोनाबाधित ; एकूण रूग्ण ६१६७

जळगाव:जिल्ह्यात आज नव्याने २०५ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ६ हजार १६७ झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ५६ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ५६, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ १६, अमळनेर ८, चोपडा ९, पाचोरा ६, भडगाव १, धरणगाव २२, यावल ७, एरंडोल २३, जामनेर ५, रावेर ११, पारोळा १५, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ७, बोदवड ५, अन्य जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात ६ बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील २, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, रावेर, बोदवड तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली

Previous post तूर्तास राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम
Next post उद्या लागणार CBSE दहावीचा निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *