१० वर्षांच्या मुलानं ३० सेकंदात बँकेतून पळवले १० लाख;

इंदूर-सकाळची साधारण ११ वाजताची वेळ. बँकेत ग्राहकांची गर्दी होती..कॅशिअरच्या काउंटरसमोर ग्राहकांची रांग लागली होती. इतक्यात एक लहान मुलगा कॅशिअरच्या केबिनमध्ये शिरला. त्यानं काउंटरवरील १० लाख रुपये चोरले आणि बँगमध्ये टाकून धूम ठोकली. अवघ्या ३० सेकंदात १० लाखांची रोकड घेऊन तो बँकेबाहेर पडला. मध्य प्रदेशातील एका बँकेच्या शाखेत घडलेला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात बँकेत ही घटना घडली. दहा वर्षांच्या मुलानं बँकेतील कॅशिअरच्या केबिनमध्ये घुसून १० लाख रुपयांची चोरी केली. मुलानं बँकेत चोरी केल्याचे बँकेतील कर्मचारी किंवा बँकेतील एकाही ग्राहकाच्या लक्षात आले नाही. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक दहा वर्षाचा मुलगा मास्क लावून को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत आला. साधारण अकरा वाजले होते. तो कॅशिअरच्या केबिनमध्ये शिरला. त्याच काउंटरसमोर ग्राहक रांगेत उभे होते. त्यांच्या नाकासमोर चोरी होत असल्याचं कुणाच्याही लक्षात आलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *