जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमित्ताने नवाब मलिक यांनी दिल्या शुभेच्छा…
मुंबई- कौशल्य विकासातून युवकांच्या प्रयत्नांना बळ देऊन त्यांना राष्ट्रीय व जागतिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग सदैव तत्पर आहे अशी ग्वाही राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मंत्री नवाब मलिक यांनी आज शुभेच्छा देतानाच कौशल्य विकास विभागाच्यावतीने व्यापक काम केले जाईल असे स्पष्ट केले.
अडथळ्यांवर मात करून, संधीचे सोने करणे या मंत्राने भारतीय युवक नेहमीच यशाचे शिखर गाठत आले आहेत. योग्य कौशल्य, नावीन्यपूर्ण विचारांमुळे युवकांना उत्तम रोजगार व नवीन उद्योग करण्याचे प्रोत्साहन मिळते असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
युवकांनो, चला तर या संधींचा लाभ घेऊया व नवीन महाराष्ट्र घडवूयात !असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.