राज्य शिक्षण बोर्डाच्यावतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, बोर्डाने बुधवारी ही घोषणा केली. परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण बोर्डाच्या वेबसाईटवरुन पाहता येणार आहेत. तसेच त्याची प्रिंट आउटही घेता येणार आहे. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयांचा एकत्रित निकालही येथे उपलब्ध होणार आहे.