अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात. अनेक व्यापारी कार्यवाही येथे केली जाते. चीनसाठी हा सराव दुहेरी हल्ल्यासारखा असू शकतो. कारण यापूर्वी अमेरिकेने दक्षिण चिनी समुद्रात दोन एअरक्राफ्ट लढाऊ विमानांसह सराव करत आहेत. चीनला त्यांना धमकी देण्याशिवाय काहीच करता येत नाही.या बेटांवर भारतीय नौदल युद्धसराव करत आहे. यात विनाशक, पेट्रोल विमान आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. या सरावाचे नेतृत्व करणारे पूर्वेकडील नौदल कमांडचे प्रमुख रियर एडमिरल संजय वत्सयन म्हणाले की, मल्लकाजवळ असणारी काही युद्धनौकाही यात सामील झाली आहे.