नवी दिल्ली- : कोरोना विषाणू या महामारीचा विळाखा दिवसागणिक आधिक घट्ट होत चालला आहे. जगात दररोज लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत १ कोटी ४४ लाख २५ हजार ८६५ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तर कोरोना बळींची संख्या ६ लाख ४ हजार ९१७ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ८६ लाख १२ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. ५२ लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत.अमेरिका, ब्राझील आणि भारताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३८ लाख ३३ हजार २७१ जणांना कोरोना झाला आहे. यापैकी १ लाख ४२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची परिस्थिती सर्वात भयानक आहे. अमेरिकासारख्या देशात कोरोना विषाणूमुळे झालेल्या नुकासानामुळे अनेक देशात भितीचे वातावरण आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये दररोज ५० हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.