अमळनेरात गेल्या २४ तासांत १८+ve रिपोर्टस्

अमळनेर–काही केल्या अमळनेरचा कोरोना थांबायला तयार नाही. सार्वत्रिक निवडणुक  निकालाच्या मतमोजणीच्या वेळी गावनिहाय जशा जशा पेट्या फुटायच्या आणि रेसमधील उमेदवारांचे मताधिक्य कमी जास्त होण्याची मॅरेथॉन सुरु असायची तसे कोरोनाचे चालू आहे. अमळनेरचा कधी हा भाग पुढे तर कधी तो भाग मागे राहतो. शहराचा एक भाग सुटला नाही. आता खेड्यांमध्येही कोरोनाचा राबता आहे. अमळनेरात गेल्या २४ तासांत १८ रुग्णांचे रिपोर्टस्  पॉझिटीव्ह आले असल्याने सोमवार सायंकाळपर्यंत येथील बाधितांचा आकडा ५७७ तर दगावलेल्या रुग्णांची संख्या ३३ वर जावून पोहचली आहे.
     रविवार रात्रीतून आणखी ९ रुग्णांचे रिपोर्टस् पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांत सगळे नवीन स्वरुपाचे  येणे प्रमाणे आहेत.  अमळनेर शहरातील असे– मुंदडा नगर, देशमुख बंगला, तांबेपूरा, गुरुकृपा कॉलनी, मेघनगरी व शिरुड नाका तसेच खेडे विभागात– मंगरुळ, देवळी आणि अमळगाव  प्रत्येकी रुग्ण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *