मुंबई – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठविण्यात येणार्या पत्रासाठी राष्ट्रवादीच्या युवकांनी पोस्ट अॉफिसच्या बाहेर रांगा लावल्याचे चित्र राज्यात पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना जय भवानी… जय शिवाजी अशा आशयाचे शब्द पत्रात लिहून २० लाख पत्र पाठवण्याचा निर्णय जाहीर केला होता.
या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून ठिकठिकाणी युवक पदाधिकारी पोस्ट ॲाफिसच्या बाहेर उभे राहुन पत्र पाठवण्यासाठी रांगा लावून आहेत.