करोनाचा विषाणू बदलतोय; लस तयार करण्यात मदत होणार!

लंडन: जगभरातील २०० देशांमध्ये फैलावणारा आणि सहा लाखांहून अधिकजणांचे प्राण घेणाऱ्याकरोना विषाणूबाबत नवीन माहिती समोर आली आहे. करोनाचा विषाणू आपले रुप बदलत असल्याचा खुलासा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे. करोना विषाणूमध्ये होणाऱ्या या बदलांमुळे लस विकसित करण्यात मोठी मदत होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनानुसार, करोना विषाणूचे काही म्युटेशन मानवाच्या रोग प्रतिकारशक्ती प्रणालीशी संबंधित एका प्रोटीनशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे करोनाचा विषाणू कमजोर होऊ शकतो. मात्र, करोनाचा विषाणू याविरोधात पुन्हा सक्रिय होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. करोना विषाणूचा खात्मा करण्यासाठी लस विकसित या नव्या माहितीचा उपयोग होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

ब्रिटनच्या बाथ विद्यापीठाच्या अॅलन राइस यांच्यासहित इतर सहभागी संशोधकांनी सांगितले की, जेव्हा म्यूटेशन (आकार बदलतात) करतात तेव्हा ही प्रक्रिया सामान्य पणे आकस्मिक असते. मात्र, करोना विषाणूच्या बाबतीत ही प्रक्रिया आकस्मिकपणे नसावी असा दावा संशोधकांनी केला आहे.

करोना विषाणूशी संबंधित हे संशोधन प्रसिद्ध मॉलिक्यूलर बॉयलॉजी अॅण्ड इव्होल्यूशन या नियतकालिकेत प्रकाशित झाले आहे. वैज्ञानिकांनी जगभरातील १५ हजारांहून अधिक विषाणूंच्या जीनोमचे आकलन करून सहा हजारांहून अधिक म्युटेशनची ओळख पटवली.

दरम्यान, जगभरात करोनाबाधितांच्या संख्येने दीड कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर, सहा लाख २१ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक संसर्ग फैलावला असून आतापर्यंत ३९ लाख करोनाबाधित आढळले असून एक लाख ४० हजार जणांचा मृ्त्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझील आणि भारतात सर्वाधिक करोनाबाधित आढळले आहेत. ब्राझीलमध्ये करोनाबाधितांची संख्या २२ लाखांहून अधिक झाली असून ८२ हजार नागरिकांना प्राण गमवावे लागले आहे. तर, भारतात १२ लाखाच्या जवळपास करोनाबाधितांची संख्या आहे. रशियात सात लाख ८७ हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे.

Previous post ऑक्सफर्डच्या करोना लसीचे मुंबई-पुण्यात मानव परीक्षण; ‘या’ महिन्यात मिळणार गुड न्यूज!
Next post द्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत, केलं ‘हे’ आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *