अमळनेर–अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांच्यावतीने दिनांक ६ जुलै रोजी अवाजवी बिलांच्या तक्रारी व वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्या बाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुषंगाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे साहेब यांना ग्राहक पंचायत अध्यक्ष व सदस्यांना दिनांक 21 जुलै रोजी सविस्तर चर्चेसाठी पाचारण केले होते . श्री ठाकरे साहेब यांनी तक्रारीच्या एक एक मुद्दा व्यवस्थित समजावून सांगितला त्यात त्यांनी वारंवार वीज पुरवठा खंडित होतो याबद्दलची सविस्तर माहिती दिली त्यात प्रामुख्याने ताडेपुरा व प्रताप मिल फिडरवर क्षमतेपेक्षा जास्त विज भार असल्याने तो कमी करून नवीन फिडर तयार करण्याबाबत विशद केले जेणेकरून वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच लॉकडाऊनच्या काळात कंटेनमेंट झोन मध्ये मान्सून पूर्व ची कामे पूर्ण करता आली नाही, त्यामुळे या पावसाळ्यात पाऊस आल्यानंतर झाडाची फांदी जर तारा ला स्पर्श झाली तरी ट्रीप होऊ शकते ते कामे आता सुरू आहेत. त्यामुळे हा त्रास पुढे होणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे किरकोळ तक्रारींची कामे करताना वीज पुरवठा त्या त्या भागापुरता बंद करावा लागतो जसे कार्बन येणे , फ्यूज टाकणे वगैरे.
दुसरी तक्रार बिलांच्या तक्रारी आल्यानंतर तक्रारी सोडवण्यात येतील व काही लगेच निराकरण करून देण्यात आल्यात असे त्यांनी अास्वस्थ केले.चालू महिन्यात ग्राहकांना वीज बिल घरपोच मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या ग्राहकांना वीज बिल मिळत नसतील त्यांनी शेजारच्या ग्राहकांचे वीज बिलाची झेरॉक्स सोबत आणावे जेणेकरून त्यांच्या चक्र मार्ग चुकला असल्यास तो दुरुस्त करण्यात येईल जेणेकरून त्यांना घरपोच बिल पुढील महिन्यात मिळेल. बर्याचदा ग्राहकांना क्रेडिट बिल निघाल्यास ते देण्यात येत नाही त्यामुळे ग्राहकांनी बिल कार्यालयात येऊन तपासून घ्यावे असे त्यांनी सांगितले.
लॉकडाउनच्या काळात अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री ठाकरे साहेब यांच्या
कुशल नेतृत्वाखाली अमळनेर शहरवासीयांना कोणत्याही प्रकारच्या वीज पुरवठ्यात खंडित होणार नाही याची त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष काळजी घेतली व अहोरात्र त्यांनी मेहनत घेतलेली आहे व एक प्रकारे त्यांनी करोना योद्धा म्हणूनच काम केलेले आहे त्याबद्दल अमळनेरग्राहक पंचायतीतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे साहेब, सहाय्यक अभियंता निलेश कुरसंगे व वैभव देशमुख उपस्थित होते तर ग्राहक पंचायत तर्फे अध्यक्ष मकसूद बोहरी सचिव विजय शुक्ल , ऊर्जा मित्र सुनील वाघ, ऍड. भारती अग्रवाल व योगेश पाने, मेहराज हुसेन आदि उपस्थित होते.