कोरोना केअर सेन्टर मधील स्टॉफ वर उपचाराची वेळ!! खाजगी डॉक्टरांना सेवेत पाचारण करण्याची मागणी !

महापालिकेतर्फे शहरात शासकीय तंत्र निकेतन तसेच आयटीआय येथे कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र आता या कोविड केंद्रांतील उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उपचाराची समस्या निर्माण झाली आहे. 

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यात डॉक्‍टरांना देखील लागण झाली आहे. वाढत्‍या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्‍हा रूग्‍णालयासह महापालिकेच्या हॉस्‍पिटलमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रूग्‍णांवर उपचार केले जात आहेत. यात महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये काम करणारे पाच डॉक्‍टर व तीन लॅब असिस्‍टंट यांना कोरोनाची लागण झाली आहे.जळगाव जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग वाढतच आहे. यात शहरातही प्रमाण अधिक बिकट झाले असून, कोरोना वाढता संसर्ग पाहता केंद्रीय समिती जळगावात दाखल झाली आहे. विशेष म्‍हणजे ही समिती दुसऱ्यांदा जळगावात येत आहे. केंद्रांतर्फे पाहणी पथक आज जळगावात दाखल झाले आहे. यात डॉ.बनर्जी, डॉ.अरविंद खुशवाह व सचिव कुणालकुमार यांचा समावेश आहे. या पाहणी पथकाने आज सकाळी जळगाव शहरातील कौतीक नगर, शिवाजी नगर तसेच इतर जास्त प्रमाणात संसर्ग झालेल्या भागात पाहणी केली. तसेच त्यांनी जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या कोविड रूग्णालयास भेट देवून पाहणी केली.

उपचार करण्यास डॉक्‍टरच नाही
जळगाव जिल्ह्यात ९ हजार ४५१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत ४६० जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरातही मोठ्या प्रमाणात लागण झाली असून अनेक भाग कटेटमेंट झोन झाले आहेत. जळगाव शहरात २ हजार ४४२ बाधित रूग्ण बाधित आहेत. महापालिकेतर्फे शहरात शासकीय तंत्र निकेतन तसेच आयटीआय येथे कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र आता या कोविड केंद्रांतील उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उपचाराची समस्या निर्माण झाली आहे.

केंद्रीय समितीकडे मागणी
महापालिकेच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यासह पाच डॉक्टर व तीन लॅब असिस्टंट यांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता उपचारासाठी डॉक्टरांच नाही. केवळ सेंटरमध्ये असलेल्‍या स्टाफवरच उपचार करावे लागत आहेत. जळगाव येथे आलेल्या केंदीय समितीकडे मनपाच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर तसेच इतर स्टाफ तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर भारती सोनवणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *