जागतिक राजकारणात रशिया हा अमेरिकेचा पारंपारिक विरोधक समजला जातो. आतापर्यंत वेगवेगळया जागतिक मुद्दांवर रशियाने नेहमीच अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे अन्य देशसुद्धा या दोन देशांच्या गटात विभागले गेले. अलीकडे अमेरिकेच्या विरोधकाच्या यादीमध्ये चीनचाही समावेश झाला आहे. आतापर्यंत वेगवेगळया जागतिक मुद्दांवर अमेरिकेचा सामना करण्यासाठी रशिया आणि चीन हे देश एकत्रित दिसले आहेत.
अमेरिकेविरोधात चीनला बळकट करण्यासाठी रशियाने त्यांना घातक शस्त्रास्त्रांचा सुद्धा पुरवठा केला. समान विरोधक असल्यामुळे रशिया आणि चीन एकत्र आले. पण भविष्यात हे चित्र बदलेले दिसू शकते. रशियाने चीनला देण्यात येणाऱ्या S-400 मिसाइल सिस्टिमच्या पुरवठयाला स्थगिती दिली आहे. हा निर्णय भविष्यात चीन-रशिया संबंध बदलाचे संकेत ठरु शकतो.