मुंबई-
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. रुग्ण संख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. याचा परिणाम सामान्य नागरिकांसोबतच राजकारणातील घडामोडींवरही झाला आहे. यामुळे पावसाळी अधिवेशन हे पुढे ढकलण्यात आलेलं होतं. मात्र आता अजून एकदा हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. 7 सप्टेंबरपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती दिली आहे.
पावसाळी अधिवेशन हे जुलैमध्ये व्हायला हवे होते. परंतु कोरोनामुळे या अधिवेशन पुढे ढकलण्यात आले होते. यानंतर पावसाळी अधिवेशन हे 3 ऑगस्टपासून सुरु होणार होतं. मात्र आता अधिवेशन 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी याविषयी माहिती दिली आहे. अधिवेशनाच्या काळात विधानभवनात लोक गर्दी करतात. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात. तसेच प्रशासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी विधानभवनात असतात. कोरोनामुळे इतक्या लोकांनी एकत्र येणं धोकादायक आहे. त्यामुळे कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच ‘कमी सदस्यांमध्ये हे अधिवेशन घेण्याचा विचार सुरू होता. मात्र काही सदस्यांवर अन्याय होईल म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं असल्याचं फडणवीस म्हणाले. अधिवेशन कधी आणि कसं घ्यायचं यासंदर्भात आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.