मात्र आता एकाच प्रकारच्या कोरोनाचा फैलाव होत असल्याची माहिती पुढे आली आहे. एकाच प्रकारचा कोरोना असल्यानं आता त्याचा मुकाबला करणं सोपं असेल. सरकारनं केलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास ब-यापैकी मदत झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

जैवतंत्रज्ञान विभागानं कोरोनाबद्दलचा अहवाल तयार केला आहे. शनिवारी हा अहवाल आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना सोपवण्यात आला. देशात कोरोनाचा ए२ओ होलोटाईप विषाणूचा वेगानं फैलावत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

या विषाणूनं दुस-या प्रकारच्या विषाणूला हटवलं आहे. सुरुवातीला भारतात कोरोना विषाणूच्या विविध प्रजाती पाहायला मिळत होत्या. यामध्ये युरोप, अमेरिका आणि पूर्व आशियातून आलेल्या कोरोनाच्या प्रजातींचा समावेश होता.