500 वर्षांच्या संघर्षानंतर अखेर अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरू होत आहे. सोमवारी गणेशाच्या पुजेने तीन दिवसांच्या विधीला सुरुवात झाली. यानंतर सीतेची कुलदेवी ‘छोटी देवकाली’ आणि भगवान रामाची कुलदेवी ‘मोठी देवकाली’ची पुजा झाली. अयोध्या आणि बनारसमधील 21 विद्वान पंडित पुजा करत आहेत. यादरम्यान तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ अयोध्येत पोहचले.
योगी अदित्यनाथ कालच अयोध्येत येणार होते, पण कॅबिनेट मंत्री कमल रानी यांच्या निधनानंतर त्यांनी दौरा रद्द केला. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
असे म्हटले जाते की, जनकपूरमध्ये राम-सीतेच्या लग्नानंतर अयोध्येत जाताना सीता आपल्यासोबत कुलदेवीची मुर्ती घेऊन आल्या होत्या. त्यांनी राम जन्म भूमीजवळच याची स्थापना केली होती. याप्रमाणेच बेनीगंजमध्ये मोठ्या देवकालीचे मंदिर आहे. महाराज सुदर्शनने द्वापर युगात याची स्थापना केल्याची मान्यता आहे.
अयोध्येतील हनुमानगडीमध्ये मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून राम अर्चना सुरू होईल. यादरम्यान वर्षातून एकदाच होणारी निशान पुजाही केली जाईल. दुसऱ्या दिवशी राम मंदिराचे भूमिपूजन होईल. पंतप्रधान अयोध्येत आल्यावर सर्वात आधी हनुमानगडीला जातील. या ठिकाणी ते मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यासोबत विशेष पुजा करतील. हनुमानगडी मंदिराचे पुजारी मधुवन दासने सांगितले की, हनुमानाशिवाय भगवान रामाचे कोणतेच कार्य सुरू होऊ शकत नाही. यामुळे आधी मोदी आणि योगी हनुमानगडीला जाऊन पुजा करतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांस्कृतीक विभाग संस्कार भारतीने मातीच्या 5100 मडक्यांना रंगवण्याचे काम हाती घेतले आहे. यांना रंग, कपडे, गोटे, आंब्याची पाणे आणि दिव्यांनी सजवले जाईल. हे मटके साकेत महाविद्यालयाकडून जाणाऱ्या अयोध्या मार्गावर ठेवले जातील.