कोरोना व्हॅक्सीन:भारतात कोरोना व्हायरसवर लस लवकरच! पुण्यातील सिरम इंस्टिट्युटमध्ये कोव्हीशील्ड लसच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलला औषध महानियंत्रकांची मंजुरी

पुणे-पुण्यातील सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडिच्या कोरोनाविरोधी लस कोव्हीशील्डच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्विनिकल ट्रायलला डीसीजीआय (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) मंजुरी मिळाली आहे. जगभरात खळबळ माजवणाऱ्या कोरोना व्हायरसवर विविध देशांवर लस तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. भारतात हे लस ऑक्सफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मदतीने पुण्यातील सिरम इंस्टिट्युट करत आहे. सिरम इंस्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला ही लस मोठ्या प्रमाणात तयार करणार आहेत. प्रति मिनिट 500 व्हॅक्सिन डोस तयार केले जातील असे वृत्त आहे.

सिरम इंस्टिट्यूट कंपनी ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांसोबत मिळून कोरोनावर लस तयार करणार आहे. ही लस एक्स्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वतीने तयार केली जात आहे. सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली. तर रशियातील आपल्या प्रायोगिक कोरोना लसीच्या 3 कोटी डोसची तयारी करत आहे. या लसीचे 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा मॉस्कोचा मानस आहे. यापूर्वी मॉडर्नना इंक या अमेरिकन कंपनीची कोरोना व्हायरस लसदेखील पहिल्या चाचणीत पूर्णपणे यशस्वी झाली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेतली असता चांगले निकाल हाती आले आहेत. पहिल्या चाचणीत 45 लोकांचा समावेश होता ते निरोगी असून त्यांचे वय 18 ते 55 असे आहे.

Previous post अयोध्येत आजपासून विधी सुरू: गणेशाच्या पुजेने मंदिर भूमिपूजनाच्या विधीला सुरुवात, पाहणी करण्यासाठी योगी अदित्यनात अयोध्यात दाखल
Next post राखी पौर्णिमा:खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रक्षाबंधन, सुप्रिया सुळेंनी शेअर केले फेसबूक लाइव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *