पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा पथकात १५० कोरोनामुक्त पोलीस

अयोध्या – अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा पथकामध्ये कोरोनामुक्त झालेले स्थानिक पोलीस होते. मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या या पोलिसांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहे. या पोलिसांमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. पुढचे काही महिने कोरोनाच्या धोक्यापासून पंतप्रधान मोदींचा बचाव करणे आवश्यक आहे.पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तंदुरुस्त सुरक्षारक्षकांची नियुक्ती हा प्रोटोकॉलचा भाग आहे. सध्याच्या या दिवसांमध्ये कोरोना योद्ध्यांपेक्षा अधिक तंदुरुस्त कोण असू शकतात? असे यूपीचे पोलीस उपमहानिरीक्षक दीपक कुमार म्हणाले. कोरोनामुक्त झालेले हे १५० पोलीस सुरक्षेच्या पहिल्या स्तरामध्ये होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *