श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असताना काश्मीर खोºयात दोन दहशतवादी हल्ले झाले. पहिला हल्ला कुलगाममध्ये झाला. या ठिकाणी भाजपच्या सरपंचाला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. तर पुलवामामध्ये पोलिसांच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात दोन जवान गंभीर जखमी झाले. कुलगाममधील गोळीबारात सरपंचाचा मृत्यू झालाय.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील कोकपोरामध्ये बुधवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. त्यांना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भाजपच्या सरपंचाला गोळी घातली. कुलगाममधील काझीगुंड येथे सरपंचावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.