पाळधी येथे माल धक्का स्थलांतर करीता रखडलेली पर्यावरण मंत्रालयाची परवानगी तात्काळ देण्याचे मंत्री महोदयांनी दिले आदेश

जळगाव – जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे माल धक्का हा पाळधी येथे स्थलांतरित करण्यात येणार होता. कारण येथे होणारी वाहतूक समस्या ,पिंप्राळा रेल्वे गेट जवळ होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे होणारे दैनंदिन अपघात मालीका आणि यात निष्पाप नागरीकांचे जाणारे बळी यामधून शहरवासीयांची सुटका व्हावी यासाठी हा रेल्वे माल धक्का पाळधी येथे स्थलांतरित करण्यात येणार होता.मात्र याकरिता पर्यावरण मंत्रालयाची परवानगी अडचण असल्याने हा माल धक्का प्रश्न रखडला होता आज दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची माजी मंत्री तथा आमदार गिरिशभाऊ महाजन भेट घेतली यावेळी त्यांच्या सॊबत खासदार उन्मेश दादा पाटील, उद्योजक सुनिल झंवर हे उपस्थीत होते. यावेळी माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी वरील सर्व अडचणी मांडून
रेल्वे माल धक्क्याला पर्यावरण मंत्रालयाची परवानगीची अडचण दूर करावी ही मागणी केली.या अनुषंगाने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लागलीच रेल्वे माल धक्क्याला पर्यावरण मंत्रालयाची परवानगी देण्यासाठी तात्काळ आदेश दिले असून जळगाव माल धक्क्यासाठी गिरीश महाजन यांचा दिल्लीतून धक्का सफल ठरल्याने लवकरच हा माल धक्का पाळधी येथे स्थलांतरित होणार आहे.
परवानगीचे तात्काळ आदेश
शहराच्या पिंप्राळा रेल्वे गेट परिसरातील अनेक वर्षांपासून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण करणाऱ्या रेल्वे माल धक्क्यामुळे नागरिकांना वाहतुकीची दररोजच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. आबालवृद्ध विद्यार्थी महिला नागरिकांचे मोठे हाल होत होते. याबाबत माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी या सर्व समस्या व अडचणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे समोर मांडल्या. माननीय मंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेत परवानगीचे आदेश दिल्याने हा माल धक्का लवकरच पाळधी येथे स्थलांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शहरवासीयांची मोठी समस्या दूर होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Previous post ठाकरे कुटूंबाच्या बदनामीसाठी पडद्यामागून पटकथा ; खा.संजय राऊत यांचा सुशांतसिंग प्रकरणी आरोप
Next post माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रजी तोमर यांची घेतली भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *