
नाणार प्रकल्प हा शिवसेनेचा पैसे कमवण्याचा व्यवसाय आहे अशी टीका नारायण राणेंनी केली होती. याबाबत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता “नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही. ते घडीत काही बोलतात, नंतर काहीतरी बोलतात. बोललल्याशिवाय त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही म्हणून ते तोच प्रयत्न करतात. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी किती प्रकल्प आणले?” असाही प्रश्न गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे.
नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना खूप काही दिलं. शिवसेनेत असताना ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले होते. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये. नारायण राणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्यं करत असतात अशीही टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.