डियन एअर फोर्सच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ‘राफेल’ फायटर विमानांनी रात्रीच्यावेळी उड्डाणाचा सराव सुरु केला आहे. हिमाचल प्रदेशच्या डोंगर रांगांमध्ये रात्रीच्या अंधारात ‘राफेल’ विमानांची गर्जना सुरु आहे. चीनला लागून असलेल्या १,५९७ किलोमीटरच्या लडाख सीमारेषेवर अजूनही तणावाची स्थिती आहे. उद्या परिस्थिती चिघळली तर लगेच प्रत्युत्तराची कारवाई करण्याच्या दृष्टीने राफेलने रात्रीचा युद्धसराव सुरु केलाय.
२९ जुलैला राफेलच्या पहिल्या तुकडीने भारतीय भूमीवर लँडिंग केले. पहिल्या तुकडीत पाच राफेल विमाने आहेत. अंबाला एअर बसेवर राफेलची गोल्डन अॅरो स्क्वाड्रन तैनात असते. राफेलच्या दोन स्क्वाड्रन असणार आहेत. पहिली स्क्वाड्रन अंबाला बेसवर तर दुसरी भूतान जवळच्या हाशिमारा बेसवर तैनात असेल. भारताने फ्रान्स बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.