सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधी, प्रियंका गांधींची भेट

राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता आहे. पीटीआयनं काँग्रेस सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेला आरोप आणि त्यानंतर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसनंतर सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. महिनाभरापूर्वी राजस्थानात सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये गेहलोत-पायलट संघर्ष उफाळून आला होता. त्यामुळे सरकारसमोर अस्थिरतेचं संकटही उभं राहिलं होतं. महिनाभरापासून हा सत्ता संघर्ष सुरू असताना अचानक बंडखोर नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे.

Previous post नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत फोर्ज कंपनीच्या सहकार्याने बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांची प्रक्रिया स्वातंत्र्य दिनाच्या आधी संपविण्याचे लक्ष्य इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल या संस्थेने ठेवले असले तरी ते पूर्ण होणे शक्य नाही. या लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला नसल्याचे एम्सने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लस विकसित केल्याची घोषणा स्वातंत्र्य दिनी होण्याची शक्यता कमी आहे. या लसीच्या एम्स व अन्य ११ संस्थांमध्ये सुरू असलेल्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. दुसरा व तिसरा टप्पाही बाकी आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत तीनही टप्पे पूर्ण होणे शक्य नाही. त्याशिवाय झायडस कॅडिला कंपनी बनवत असलेल्या झायकोव्ह-डी लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा पार पाडण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ व सिरम इन्स्टिट्यूट संयुक्तपणे बनवत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्याही सुरू आहेत. मात्र वर्षाअखेरपर्यंत लस विकसित होण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळली आहे.
Next post एक्स्प्रेस, मेल तसंच लोकल वाहतूक ३० सप्टेंबर पर्यंत बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *