करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लोकल, मेल आणि एक्स्प्रेस सेवा बंद करण्यात आली होती. नंतर या निर्णयाला ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता मात्र ३० सप्टेंबरपर्यंत मेल, एक्स्प्रेस आणि लोकल बंद राहणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाउन असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. आता ३० सप्टेंबरपर्यंत लोकल वाहतूक, मेल आणि एक्स्प्रेस बंद राहणार आहेत. असं असलं तरीही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष लोकल सेवा सुरुच राहणार आहेत. तसेच रेल्वेने सुरु केलेल्या विशेष लोकल सुरुच राहणार आहेत. नियमित एक्स्प्रेस, मेल आणि लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद असणार आहे.