करोना लशीला रशियाची मंजुरी; पुतीन यांनी स्वत:च्या मुलींना टोचली लस

मॉस्को: दीर्घकाळ प्रतिक्षेनंतर रशियाने करोनावरील पहिल्या लशीला मंजुरी दिली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लामदिर पुतीन यांनी याबाबत घोषणा केली आहे. करोनावर लस शोधणारा आता रशिया पहिला देश ठरला आहे. मात्र, या लशीवरून आता जागतिक आरोग्य संघटना आणि रशिया आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितले की, आज जगातील पहिली करोना प्रतिबंधक लशीची नोंदणी करण्यात आली आहे. ही लस विकसित करणारे आणि उत्पादन करणाऱ्यांचेही आभार मानत असल्याचे पुतीन यांनी सांगितले. ही लस आपल्या दोन्ही मुलींनीही घेतली असल्याचे पुतीन यांनी सांगितले. या दोघींचीही प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी म्हटले.

मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने ही लस विकसित केली आहे. या लशीमध्ये असलेले पार्टिकल्स पुन्हा स्वत:ला रेप्लिकेट (कॉपी) करू शकत नाहीत. संशोधन आणि लस उत्पादनात सहभागी झालेल्या अनेकांनीही लस टोचून घेतली असल्याचे वृत्त आहे. ही लस घेतल्यानंतर ताप येण्याची शक्यता आहे. मात्र, ताप आल्यास पॅरासिटेमोलच्या गोळ्या घेण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. या लशीची नोंदणी करण्यात आल्यानंतर तीन ते सात दिवसांमध्ये ही लस सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. करोनाला अटकाव करणारी ही लस गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमीलॉजी अॅण्ड मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे.

Previous post सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय:मुलींनाही मिळणार वडिलांच्या संपत्तीत समान वाटा, 2005 मध्ये अस्तित्त्वात आलेल्या नवीन हिंदू उत्तराधिकार कायदा येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असला तरीही
Next post महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *