स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही हिवरी वासियांचा वाघूर नदीवरील पुलाचा प्रश्न प्रलंबित . मतदानावर बहिष्कार टाकूनही पदरी निराशा . वाघूर नदीच्या पुरामुळे वारंवार तुटतो संपर्क .

पहूर ,ता .जामनेर -जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या कुशीत उगम पावलेल्या वाघुर नदीवर वसलेल्या जामनेर तालुक्यातील हिवरी आणि हिवरखेडा या दोन गावांना जोडणारा पूल स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही प्रलंबितच असल्याने हिवरी वसियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .
सुमारे ६०० लोकवस्तीचे हिवरी गाव असून पलीकडच्या तीरावर हिवरखेडा हे गाव आहे . वाघुर नदीच्या दोन्ही तीरावरील ही गावे हिवरी -हिवरखेडा या जुळ्या नावानेच ओळखली जातात . दोघा गावांचा परस्परांशी संपर्क येतो . मात्र हा संपर्क पावसाळ्यात वारंवार तुटतो .कारण नदीवर पूलच नसल्याने पाणी ओसरल्यावर अगदी जीव मुठीत घेऊन नदीतून प्रवास करावा लागतो . हिवरी गावात मराठी माध्यमाची शाळा नसल्याने येथील विद्यार्थी नदीच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या हिवरखेडा गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकायला जातात . मात्र जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा विद्यार्थी हक्काच्या सुट्टीवर असतात .सध्या कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत .मात्र एरवी पुराच्या पाण्यामुळे शाळेला दांडी मारावी लागत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते . या नदीवर पूल व्हावा ,यासाठी हिवरी येथील नागरिकांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे . तसेच निवडणुकांमध्ये येथील ग्रामस्थांनी पूलाची मागणी करत मतदानावर बहिष्काराचे शस्त्रही उगारले आहे .मात्र हिवरीवासियांची पूलाची मागणी स्वातंत्र्य मिळवून ७३ वर्षे पूर्ण होवूनही प्रलंबितच आहे . या ज्वलंत समस्ये बद्दल dainik punyapratap ने स्वातंत्र्यदिनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांची मतं जाणून घेतली . यावेळी राजधर पाटील यांच्या सह महिला उपसरपंच ,पोलीस पाटील , माजी ग्रामपंचात सदस्य , यांच्या सह ग्रामस्थांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या .

Previous post राज्यात तिसऱ्यांदा करोना चाचणीच्या दरात कपात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
Next post ग्रामविकास विभागाचा महत्वपूर्ण निर्णय:आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी;हसन मुश्रीफ यांची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *