विमानतळावर सुरक्षेत वाढ झाली आहे. परिणामी त्याकरता होणा-या खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे एव्हिएशन सुरक्षा शुल्क देखील वाढवण्यात आले आहे. यामुळे विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे. सीआयएसएफ देशातील ६१ विमानतळांवर सुरक्षा उपलब्ध करून देते. कोरोना व्हायरस मुळे याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे सीआयएसएफकडून प्रवाशांची तपासणी करताना पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज यांसारख्या सुविधांचा वापर केला जात आहे. एकंदरितच खर्चामध्ये यामुळे वाढ झाली आहे. एव्हिएशन सिक्यूरिटी फी वाढीसंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाने १३ ऑगस्टरोजी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सरकारने एअरक्राफ्ट रूल्स १९३७ चा वापर करत एव्हिएशन सिक्युरिटी फीमध्ये वाढ करण्यास मंजूरी दिली आहे.

सरकारने एव्हिएशन सुरक्षा शुल्कात २०१९ मध्ये २० रुपयांनी वाढ केली होते. त्यानंतर हे शुल्क १५० रुपये प्रति प्रवासी झाले होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समधील या दोन्ही प्रवांसाठी हे शुल्क वाढवण्यात आले आहे.